Home अकोले संगमनेर व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात रवानगी

संगमनेर व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात रवानगी

inspectors of Sangamner and Akole police stations sent to control roomSangamner

संगमनेर: संगमनेर पोलीस ठाण्याचे व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यावर कारवाई करत तत्काळ नियंत्रण कक्षात दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख पत्नी हरविल्याच्या प्रकरणातील व्यापाऱ्याकडून एक हजार रुपयाची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रांगेहात पकडले होते. यांनतर दोन दिवसांतच अकोले पोलीस ठाण्यातील संतोष वाघ याला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या लाचाखोरींच्या प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने धिंडवडे निघाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलातील मनमानीला चांगलाच चाप लाविला होता. ज्या पोलीस ठाण्यात गैर प्रकार होईल तेथील प्रमुख अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे या दोन निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे दिसून येत आहे.

संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचे सत्र सुरु करून अवैध धंद्यांना चांगलाच चोप लाविला होता. तसेच अकोले तालुक्यातील पोलीस निरीक्षक अभय पारमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. यांनीही अकोलेतील अवैध धंद्यांना चांगलाच आळा बसविला होता. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीमुळे शहर पोलीस ठाणे सोडण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

Web Title: inspectors of Sangamner and Akole police stations sent to control room

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here