Home संगमनेर Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात एका मजुराची भोकसून हत्या

Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात एका मजुराची भोकसून हत्या

laborer was stabbed to death in Sangamner taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे एका मजुराचा धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. किरकोळ कारणाच्या भांडणातून हा मजूर भोकासल्याने जखमी झाला होता. नाशिक येथे उपचार सुरु असताना त्याचे सोमवारी रात्री निधन झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथून संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे मजुरीसाठी जात असलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून दोघा तरुणांमध्ये वाद झाले. एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार हत्यार पोटात घुपसले.  याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयत भीमा बाजीराव डोके वय २२ यास उपचार करण्यासाठी नाशिक येथे नेण्यात आले होते. त्याच्या पोटात गंभीर जखम झाली होती.  सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर संगमनेर पोलीस ठाण्यात अजय मलखान तामचिकर रा. धांदरफळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.    

Web Title: laborer was stabbed to death in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here