Home अहमदनगर माजी महापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

माजी महापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Suvarna Kotkar application rejected by the court

अहमदनगर | Ahmednagar: माजी महापौर सुवर्णा कोतकर यांच्यावर केडगाव येथील शिवसैनिक दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल असून त्यांचा मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

केडगाव येथे ७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यामध्ये सुवर्णा कोतकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे.

गुन्हा झाल्यापासून सुवर्णा कोतकर या फरार झाल्या होत्या. मागील महिन्यात त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकारी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सुवर्णा कोटकर यांच्या वतीने वकील नितीन गवारे तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील केदार केसकर हे युक्तिवाद करत आहेत. न्यायालयाने या प्रकरणावर मंगळवारी निकाल दिला आहे. त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.   

Web Title: Suvarna Kotkar application rejected by the court

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here