Home अहमदनगर बनावट डीझेल प्रकरणी तपास आता अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे

बनावट डीझेल प्रकरणी तपास आता अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे

an investigation into the fake diesel case is now with Sandeep Mitke

अहमदनगर: नगर शहरात २६ ऑक्टोबर रोजी बनावट डीझेल पकडल्या गेल्याने या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे होता. तो आता श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर तपासाला गती न मिळाल्यामुळे हा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ढुमे यांच्याकडून काढून संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला होता, हे प्रकरण गंभीर असताना देखील मागील पंधरा दिवसांत केवळ दोनच जणांना अटक झाली आहे.

सुरुवातीला पहिल्याच दिवशी एका आरोपीला अटक झाली होती. त्यानंतर ढुमे यांच्या पथकाने जामखेड येथील एकास अटक केली. त्यांनतर तपासात विशेष अशी गती आढळून आली नाही. उपाधीक्षक संदीप मिटके यांना नगर जिल्ह्याचा कामाचा अनुभव जास्त असल्याने हा तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे समजते.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: an investigation into the fake diesel case is now with Sandeep Mitke

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here