Home क्राईम किराणा दुकान फोडले, लाखो रुपयांचा माल लंपास

किराणा दुकान फोडले, लाखो रुपयांचा माल लंपास

Shevgaon Grocery store burglary

शेवगाव | Shevgaon: चोरट्यांनी शहरातील पैठण रोडवरील सार्थक किराणा स्टोअर्सचे पत्रे उचकटून तब्बल एक लाख ८७ हजार रुपयांचा किराणा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच शुभम अग्रो एजन्सी  या कृषी सेवा दुकानातून १ लाख १ हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पैठण रस्त्यावरील सार्थक किराणा स्टोअर्स शुभम एजन्सी ही दोन्ही दुकाने पत्र्याच्या सहायाने तयार केलेली असून मागील बाजूस बाभळी व घाणीचे साम्राज्य असल्याने चोरीसाठी मागील बाजूने पत्रे काढून दुकानात प्रवेश करता येथो. त्यामुळे सणासुदीच्या मोठ्या प्रमाणात भरलेला माल लंपास केला आहे. शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी पहाटे २ ते ४ वाजेच्या दरम्यान पत्रे एका बाजूने कापून आत प्रवेश केला. तसेच याच दुकानातून आतील बाजूने पत्रे कापून सार्थक किराणा स्टोअर्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील किराणा सामान असा सुमारे दोन लाख ८ हजार रुपयांचा माल लंपास केला. एकास पत्र्याने दुखापत झाल्याने रक्त तेथे आढळून आले.

याबबतची माहिती पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shevgaon Grocery store burglary

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here