मुलीने प्रेमविवाह केल्याने तरुणास मारहाण
कोपरगाव | Kopargaon: मुलीच्या नातेवाईक यांनी मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या भावाला गजाने मारहाण केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात घडली. रवींद्र लक्ष्मण सोनवणे असे या जखमी तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी रवींद्र सोनवणे यांने फिर्याद दिली असून त्यानुसार रवींद्र चा भाऊ संतोष सोनवणे याने प्रतीक्षा पवार या मुलीशी प्रेमविवाह केला. त्या रागातूनच पिराजी खंडू पवार, साईनाथ पिराजी पवार, वैभव पिराजी पवार, सुरेश पिराजी पवार रेखा सुरेश पवार सर्व रा. टाकळी रोड ब्राम्हणगाव शिवार यांनी मारहाण केली.
३० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगल राजेंद्र सोनवणे यांच्या घरासमोर ब्राम्हणगाव येथे शिवीगाळ करून गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद रविन्द्र सोनवणे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे ब्राम्हणगाव शिवारात एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Kopargaon Young man beaten for marrying a girl