Home जामखेड मासेमारीसाठी वाहून गेलेले चुलते पुतणे यांचा मृतदेह १० तासांनी सापडला

मासेमारीसाठी वाहून गेलेले चुलते पुतणे यांचा मृतदेह १० तासांनी सापडला

Jamkhed body of his cousin was found 10 hours later

जामखेड | Jamkhed: मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील चौंडी येथील सीना नदीवर चुलते पुतणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात बुडाले होते. सतीश बुवाजी सोनवणे वय ४३ व तुषार गुलाबराव सोनवणे असे त्यांची नावे आहेत.

मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या कर्मचार्यांना घेऊन घटनास्थळी गेले होते.

पाण्याचे वेग जास्त तसेच अंधार पडल्यामुळे मृतदेह सापडण्यास अडथळे निर्माण झाले होते. मात्र आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास चुलते पुतणे यांचा मृतदेह आढळून आला आहे. जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्यासाठी मृतदेह नेण्यात आले होते.    

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Jamkhed body of his cousin was found 10 hours later

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here