Home अहमदनगर चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, दोन तरुणांना अटक

चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, दोन तरुणांना अटक

Jamkhed Four pistols and six cartridges seized two youths arrested

जामखेड | Jamkhed: शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जामखेड शहरात विक्रीसाठी आणलेली चार पिस्टल व सहा काडतुसे असा १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून मोठे राकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ऋषी उर्फ पप्पू मोहन जाधव व २२ रा.जामखेड व दीपक अशोक चव्हाण रा. जामखेड अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे दोघे तरुण पिस्टल विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांच्या सहकारांनी त्यांच्या घरी छापा टाकत त्यांच्याकडील चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली.

पप्पू जाधव यांच्याकडे वापराची परवानगी नसलेले एक अग्निशस्त्र पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळून आले. तर दीपक अशोक चव्हाण यांच्याकडे ३ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने आणले होते. यातून पिस्टल विक्रीचे मोठे राकेट उघड होण्याचे चिन्ह दिसण्याची शक्यता आहे.  

Web Title: Jamkhed Four pistols and six cartridges seized two youths arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here