Home अहमदनगर व्यापारी गौतम हिरण यांची हत्या या कारणामुळे झाली, पाच आरोपी अटकेत

व्यापारी गौतम हिरण यांची हत्या या कारणामुळे झाली, पाच आरोपी अटकेत

Trader Gautam Hiran was killed for this reason

श्रीरामपूर: बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. हे हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे तपासाची माहिती दिली.

या प्रकारातील अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मोबाइल फोन व कारसुद्धा जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी सिन्नर येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. संदीप मुरलीधर हांडे वय २६ माळेगाव ता. सिन्नर, जावेद बाबू शेख सप्तशृंगी नगर नायगाव रोड, सिन्नर, अजय राजू चव्हाण वय २६ पास्तेगाव मारुती मंदिरासमोर सिन्नर, नवनाथ धोंडू निकम वय २९ रा. उक्कडगाव ता. कोपरगाव व एक २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

हिरण यांच्याकडे अपहरण झाले त्यावेळी ६५ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या कारमध्येच करण्यात आली. नंतर तो मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाजवळ आणून टाकण्यात आला अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली.

अपहरण झाले त्यावेळी मारुती कारमधून संशयास्पद एका व्यक्तीला नेताना पाहिले होते, त्यावरून पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. सदर गाडी नाशिक येथील असल्याचे समजले. ती मुख्य मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय वाढल्याने काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडण्यात आले.या गाडीत हिरण यांच्या मोबाईल व बँकेचे चेकबुक सापडले. या एका चुकीमुळे पोलिसांना फायदा मिळाला मात्र याविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Trader Gautam Hiran was killed for this reason

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here