संगमनेर तालुक्यात सध्या करोनाच्या इतक्या रुग्णांवर उपचार सुरु
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २८० इतकी आहे. आज १८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ३० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरात सुयोग कॉलनी येथे ६३ वर्षीय पुरुष, इंदिरानगर गल्ली नंबर ९ येथे ३८ वर्षीय पुरुष, मेन रोड येथे ५६ वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथे ३६ वर्षीय पुरुष, इंद्रायणी कॉलनी येथे ४६ वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड येथे ५२ वर्षीय पुरुष तर ५६ वर्षीय महिला, ज्ञानेश्वर गल्ली येथे २९ वर्षीय पुरुष, नासिक पुणे रोड सुयोग सोसायटी येथे ७२,४६ वर्षीय पुरुष, ५७ व ३२ वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नर येथे ३७ वर्षीय महिला, मेहेर मळा येथे ४९ वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर बायपास रोड येथे ४४ वर्षीय पुरुष, नेहरू गार्डन मार्ग येथे ५२ वर्षीय पुरुष, स्वातंत्र्य चौक येथे ७४ वर्षीय पुरुष असे १७ जण बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून तळेगाव दिघे येथे ५० वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे ४३ वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे ५१ वर्षीय पुरुष, नानज दुमाला येथे ५१ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ५४ वर्षीय महिला, राजापूर येथे ६८ वर्षीय महिला, वाघापूर येथे ६५ वर्षीय पुरुष, निमज येथे २४ वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे ३७ व ६५ वर्षीय पुरुष, खराडी येथे ६१ वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ६७ वर्षीय पुरुष, देवकौठ येथे ६८ वर्षीय पुरुष असे १३ जण बाधित आढळून आले आहे.
Web Title: Sangamner Taluka Today Corona update 30 positive