चारित्र्याचा संशयातून विवाहितेचा छळ, गळफास घेत आत्महत्या
जामखेड | Jamkhed: आरोळे वस्ती येथील विवाहितेवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा वेळोवेळी छळ केला जात असल्याने या छळाला कंटाळून विवाहिता मालन परशुराम लोखंडे हिने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विवाहित महिलेच्या माहेरकडील मंडळीना करमाळा तालुक्यातील देवळाली येथील नातेवाईकांना ही माहिती मिळताच या लोकांनी जामखेड पोलीस स्टेशन समोर गर्दी करून सासरच्या मंडळीवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सासरकडील पती, सासू, सासरा यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात आरोळे वस्ती येथे विवाहितेचा छळ आरोपी पती परशुराम यादव लोखंडे, यादव लोखंडे सासरे, ताई यादव लोखंडे सासू हे तिघे करीत असे. दिसायला चांगली नाही, कामे येत नाही, स्वयंपाक येत नाही असे तिचा छळ केला जात होता. तसेच पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. याचा मारहाणीला कंटाळून विवाहितेने ३० नोव्हेंबर रोजी राहत्या घरात छताला गळफास घेतला. तिला जामखेड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना तिचा काल ६ डिसेंबरला मृत्यू झाला.
Web Title: Jamkhed marital harassment, strangulation and suicide