Home अहमदनगर Theft: दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत हजारोंचा ऐवज लुटला

Theft: दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत हजारोंचा ऐवज लुटला

Jamkhed robbers Theft thousands in fear of the sword

जामखेड | Jamkhed  Theft News:  जामखेड शहरातील बीड रोडलगतच्या शिक्षक कॉलनी येथे अज्ञात चोरटयांनी एस.टी. चालक विजय खुपसे यांना तलवारीचा धाक दाखवत घरातील ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन (Theft) नेल्याची घटना दिनांक २७ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच अज्ञात दरोडेखोरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी एस.टी. चालक विजय नवनाथ खुपसे (रा . शिक्षक कॉलनी, जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना दि २७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ५ दरोडेखोरांनी त्यांच्या स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आणि फिर्यादी विजय नवनाथ खुपसे यांना तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरुममध्ये जाऊन कपाट तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. यावरून बसचालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच अज्ञात चोरटेविरोधातत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Ttile: Jamkhed robbers Theft thousands in fear of the sword

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here