Home अहमदनगर Accident: टेम्पोने दुचाकीस्वराला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

Accident: टेम्पोने दुचाकीस्वराला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

Jamkhed Tempo motarcycle Accident one death

जामखेड| Accident: साकत जामखेड रोडवर सावरगाव शिवारात भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एका जणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुज अजिनाथ लांबरूड रा. लांबरवाडी ता. पाटोदा असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अजिनाथ काशिनाथ लांबरूड याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने टेम्पो चालक अण्णासाहेब अर्जुन पठाडे रा. चिंचपूर ता. आष्टी जि. बीड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पठाडे याने त्याच्याकडील टेम्पो हलगर्जीपणाने व अतिवेगाने चालवून सावरगाव शिवारात पाठीमागून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लाटे हे करीत आहे.   

Web Title: Jamkhed Tempo motarcycle Accident one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here