Home अहमदनगर Murder | जामखेड खून प्रकरण: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने केला...

Murder | जामखेड खून प्रकरण: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने केला पतीचा खून  

Jamkhed Wife murder her husband for being an obstacle in an immoral relationship

जामखेड | Jamkhed: खर्डा ता. जामखेड येथील विशाल सुर्वे या तरुणाचा खून (Murder) प्रकरणाचा उलगडा करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासांत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींमध्ये पत्नीचा सहभाग असल्याचा समोर आले आहे.

खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या मंदिराजवळ विशाल सुर्वे याचा टेम्पो अडून डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करीत खून केला होता. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेने जामखेड तालुका हादरला होता.

त्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी वेगवेगळी तपास पथके तयार केली. पोलिसांच्या तापासात स्थानिक भागातील अनेकांवर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता विशाल याच्या जवळच्यानी खून केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा संजय सुर्वे, श्रीधर राम कान्हेकर, पूजा विशाल सुर्वे या तिघांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: Jamkhed Wife murder her husband for being an obstacle in an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here