Home संगमनेर संगमनेरात हुक्का पार्लरवर छापा, मालकासह ११ जण ताब्यात- Raid

संगमनेरात हुक्का पार्लरवर छापा, मालकासह ११ जण ताब्यात- Raid

Raid on a hookah parlor in Sangamner

Sangamner | संगमनेर: संगमनेर ते गुंजाळवाडी रस्त्यावर दि सिक्रेट पॅरडाइज कॅफे येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा (Raid) टाकला. रविवारी रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी हुक्का पार्लर चालकासह ११ जण ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कॅफे मालक पंकज सुभाष शिंदे, ग्राहक प्रतिक मुळे वय २१ रा. चंद्रशेखर चौक, मयूर काळे वय २४ रा. नेहरू चौक, श्रेयस काळे वय २२ रा. पार्श्वनाथ गल्ली, श्रवण नावंदर वय २८ रा. संगमनेर, रोशन वाबळे वय २२ रा. विठ्ठल मंदिरासमोर, आदेश गुंजाळ रा. बाजारपेठ, शुभम लगे वय २६ रा. घुलेवाडी, आकाश तवरेज वय २७ रा. नवघर गल्ली, शुभम काळे वय २८ रा. पार्श्वनाथ गल्ली, ऋतिक काळे रा. नेहरू चौक यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना संगमनेर ते गुंजाळवाडी रोड मध्ये कॅफेत हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून छापा टाकला. या कारवाईत ३८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सचिन उगले हे करीत आहे.  

Web Title: Raid on a hookah parlor in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here