Home Suicide News पत्नीच्या आत्महत्येनंतर काही वेळातच पतीने घेतला गळफास, लिहून ठेवले असे

पत्नीच्या आत्महत्येनंतर काही वेळातच पतीने घेतला गळफास, लिहून ठेवले असे

Jamkhed wife's suicide the husband strangled

जामखेड | Suicide Case: जामखेड शहरात दोघा पती पत्नीची आत्महत्या घडल्याची घटना घडली आहे. या दांपत्यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. पत्नी पाठोपाठ पतीनेही गळफास घेतल्याची घटना घेतली आहे.

अजय कचरदास जाधव वय ३२, शिल्पा अजय जाधव वय २८ दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर अशी आत्महत्या केलल्या दाम्पत्याची नावे आहेत.

अजय व शिल्पा या दोघांचे चार महिल्यापुर्वी विवाहसोहळा पार पडला होता. बुधवारी दुपारी शिल्पा जाधव हिने बीड रस्त्यावरील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिचा पती अजय यास ही माहिती समजली. त्यानंतर काही वेळातच अजय याने शहरातील मोरे वस्ती येथील पाण्याच्या प्लांट ऑफिसमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले. या दोघा पती पत्नीने जीवन का संपविले याचे कारण समजू शकले नाही.

पती अजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली त्यात माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे. इतर कोणासही दोषी ठरवू नये असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

या दोघांचे मृतदेह शावविचेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक जाधव याने पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

Web Title: Jamkhed wife’s suicide the husband strangled

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here