Home नाशिक मोटारसायकल कालव्यात कोसळून जवानाचा मृत्यू

मोटारसायकल कालव्यात कोसळून जवानाचा मृत्यू

जवानाचा माटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल गोदावरी उजव्या कालव्यात कोसळली. जवान कालव्याच्या पाण्यात वाहून गेला.

jawan died after his motorcycle fell into the canal

सिन्नर: पत्नी व मुलासह मोटारसायकलने जाणऱ्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलात कार्यरत जवानाचा माटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल गोदावरी उजव्या कालव्यात कोसळली. यात जवानांच्या पत्नी व मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. जवान मात्र कालव्याच्या पाण्यात वाहून गेला असून रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.

सदर जवानाचे नाव गणेश सुकदेव गिते वय वर्षे ३६ असून शिर्डी येथून देव दर्शन करून गावाकडे परतत असताना चौंढी शिवारात गुरुवारी दि. ९/०३/२३ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. मेंढी गावाचा राहवासी असलेला गणेश गिते पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात आहे. मेंढी ब्राम्हणवाडे रस्त्यावरील वळणावर गणेश याचा मोटारसायकल वरील ताबा सुटल्याने गाडी कालव्यात पडली. कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेला. पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी, आणि मुलगा अभिराज यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहा. पो. निरिक्षक संदेश पवार, हवालदार बागुल, ठाकुर, पो. नाईक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेशच्या मृतदेहाचा अधिक तपास चालु आहे.

Web Title: jawan died after his motorcycle fell into the canal

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here