राज्यात सोमवारनंतर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट
Whether Update: १६ व १७ मार्चला संबंध राज्यात मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला.
पुणे: राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येऊ घातले असून, सोमवारनंतर राज्याच्या उत्तर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून, १६ व १७ मार्चला संबंध राज्यात मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य भागात सोमवारनंतर पश्चिमी चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे द्रोणीय रेषा तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
डॉ. काश्यपी म्हणाले, “रविवारनंतर ढगाळ स्थिती तयार होणार आहे. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचीही शक्यता आहे. त्यानंतर गुरुवारी ढगांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यादरम्यान १६ व १७ मार्चला मेघगर्जनेसह व सोसाट्याच्या वाऱ्यासह संबंध राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ताशी ३० ते ४० किलोमीटर असण्याची शक्यता आहे.”
Web Title: Whether Update Unseasonal rain again in Maharashtra after Monday
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App