Home अकोले जितेंद्र आव्‍हाड यांना मंत्रीमंडळातून हाकलण्याची मागणी

जितेंद्र आव्‍हाड यांना मंत्रीमंडळातून हाकलण्याची मागणी

अकोले:  रात्री १२ वाजता पोलीस ठाण्यात चल असे सांगून पोलीस राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जातात व बंगल्यावर २५ जणांच्या गटाने  पोलीसांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंत्री करीत आहे. अश्या गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्याला ताबडतोब मंत्रीमंडळातून हकला अशी मागणी अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

             याबाबद प्रसिद्धीस दिलेल्या म्हटले आहे की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता दिवे प्रज्‍वलित करण्‍याचे आवाहन केले होते. त्यानंतर आव्‍हाड यांनी त्याविरोधात ट्विट, व्हीडिओ, व्‍हॉटसअप मॅसेज करून पंतप्रधानाच्‍या आवाहनाची खिल्‍ली उडवली. आव्‍हाडांच्‍या या भुमिकेचा वैचारिक विरोध करत ठाण्‍यातील अनंत करमुसे यांनी एक पोस्‍ट शेअर केली. करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असे सांगून घरातून बाहेर बोलवले आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेले. तेथे आव्‍हाड उपस्थित होते. त्यांनी ‘त्‍या तरूणाला तू का लिहीले विचारेल असता, तुम्‍ही मंत्री असुन पंतप्रधानाच्‍या विरोधात लिहीतात तर मी तुमच्‍या विरोधात भूमीका घेतली तर माझे काय चुकले, असा प्रतिप्रश्न केला. त्‍यानंतर बंगल्‍यातील पंचवीसहून अधिक गुंडांनी अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केली. त्‍यातीलच एका गुंडाच्‍या फोनवरून अनंत करमुसे यांच्‍या घरी फोन लावुन करमुसे यांची पोस्‍ट हटवण्‍यास सांगण्‍यात आले. मारहाणी नंतर पोलिसांनी करमुसे पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पोलीसांनी करमुसे यांच्‍या विरोधातच तक्रार दाखल केली आहे. करमुसे यांना उपचारासाठी नेण्‍यानंतर पुन्‍हा करमुसे यांनी पोलिसात येऊन घडल्‍या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्‍याचा आग्रह धरला. अपहरण, संचारबंदीचा कायदा मोडणे, जिवे मारहाण करणे अशा कलमाखाली करमुसे यांनी तक्रार दाखल केली. गेली दोन दिवस पोलिसांनी हे प्रकरण दाबुल ठेवले होते अखेर करमुसे यांच्‍या आग्रही भुमिकेमुळे आज पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस गाडीतुन पोलिस स्‍टेशनमध्‍ये न नेता थेट जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या बंगल्‍यावर नेले व तेथे त्‍याच्‍या उपस्थितीत करमुसे यांना मारहाण झाली आणि पोलिसांनी बघ्‍याची भुमिका घेतली आहे

       एक मंत्री असूनही कायदा हातात घेउन स्वतःच्या बंगल्यावर  मोडुन एका तरुणाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करतो.सामान्य जनतेने कायदा मोडला तर त्यांच्यावर कारवाई होते मग सरकार मधील मंत्र्यांनीच कायदा मोडला तर कारवाई का नाही ? लोकडाऊन असताना एका तरुणाचे अपहरण करून त्याला बंगल्यावरील गुंडांकडून बेदम मारहाण करणे एका मंत्र्याला शोभते काय ? हा महाराष्ट्र आहे युपी बिहार नव्हे की आपल्या बंगल्यावर नेउन सामान्य जनतेला सरकार मधील मंत्री बेदम मारहाण करतो.

कायदा सर्वांना समान आहे तर अजूनही आपल्या बंगल्यावर नेउन तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर कारवाई का नाही ? असे अनेक प्रश्न आहेत

    तरी जितेंद्र आव्हाड यांना मंत्री मंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, भाजपचे जीप गटनेते जालिंदर वाकचौरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, सुनील उगले, राजेंद्र गवांदे, राहुल देशमुख, सुशांत वाकचौरे, राजेंद्र शेळके, वाल्मिक देशमुख, वाल्मिक नवले,सौरभ देशमुख, विजय पवार, राजेंद्र लहामगे, श्रीकांत भुजबळ आदींनी केली आहे.

     कोट:-  जितेंद्र आव्हाड हे नेहमी वादग्रस्त असून अकोले येथील तायडे दंगलीच्या वेळी प्रसार माध्यमातून बोलताना म्हटले होते की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अकोले पोलीस स्टेशन जाळून टाकले आहे व   लिंबाच्या झाडाखाली पोलीस स्टेशन भरते असे चुकीचे विधान करीत होते. असल्या मंत्र्यांना तातडीने मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे.

Website Title: Jitendra Awhad to be removed from the Cabinet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here