Home महाराष्ट्र पंतप्रधान मोदींजींच्या आवाहनाला खासदार लोखंडेचा प्रतिसाद

पंतप्रधान मोदींजींच्या आवाहनाला खासदार लोखंडेचा प्रतिसाद

मुंबई:   पंतप्रधान मोदींनी आज रात्री नऊ वाजता कोरोनाच्या विरोधातील लढ्यासाठी ज्या दीपोत्सवाचे आवाहन केले होते यामध्येही खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी आपल्या कुटूंबासह सहभाग नोंदविला आहे. मुंबईच्या राहत्या घरी लोखंडे यांनी मेणबत्ती पेटवून हा सहभाग नोंदविला. व साईचरणी कोरोना विरुद्धची लढाई लवकर जिंकण्यासाठी व देशातील जनतेची यासंकटातून लवकर मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना केली.

खासदार सदाशिव लोखंडे  यांनी यापूर्वीच आपल्या विकास निधीतून एक कोटीची मदत देऊन आपणही या लढ्यात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. लोखंडे हे वेळोवेळी जिल्हाधिकारी राहुल द्वेदी यांच्यासह जिल्हा मुख्यआरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात असून सद्यस्थितीचा आढावा घेत आहे. जिल्ह्याबरोबरच संगमनेर,लोणी,  कोल्हार, हासनापूर, दाढ मध्ये कोरोना संशियित रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. मात्र लोकांनी घाबरून न जाता घराबाहेर न पाडण्याचे आवाहन खासदार लोखंडे यांनी केले आहे.

अनेक विकसित देशांनी कोरोनापुढे हात टेकले आहे,  मात्र त्या तुलनेत देशासह महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली ती नक्कीच कौतूकास्पद असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले. आज ज्या पद्धतीने देशाने एकजूट दाखवली ती नक्कीच कौतुकास्पद असून आपण लवकरच कोरोनाच्या समस्येवर मात करू असा विश्वासही लोखंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Website Title: Latest news MP responds modi Sadashiv Lokhande

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here