Home संगमनेर भाजपात गेलेल्यांची तोड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था: सत्यजित तांबे

भाजपात गेलेल्यांची तोड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था: सत्यजित तांबे

Joined the BJP are beaten up Satyajeet Tambe Patil

संगमनेर: कॉंग्रेस पक्षात मानसन्मान असलेले अनेक नेते लोकसभा व विधानसभा निवडणूक दरम्यान भाजपात प्रवेश केला. भाजपात त्यांना काही मान सन्मान नसून त्यांना पाचव्या व सहाव्या रांगेत बसावे लागत आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था त्यांची झाली आहे अशी टीका युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe Patil) यांनी केली आहे.

सत्यजित तांबे म्हणाले कॉंग्रेस पक्षाला परंपरा आहे. पक्षाची विचारधारा ही राज्यघटनेशी बांधील आहे. पक्ष अनेक अडचणीतून बाहेर पडला आहे. पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे. आगामी काळात तरुणांना कॉंग्रेस पक्षात मोठी संधी आहे. राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. निवडणुकी दरम्यान अनेकांनी पक्ष सोडला त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या जागा आता तरुणांनी घेतल्या आहेत असे तांबे म्हणाले.  

रविवारी संगमनेर अमृता लोंस येथे युवक कॉंग्रेस आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.

Web Title: Joined the BJP are beaten up Satyajeet Tambe Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here