Home अकोले मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाची व  समाजाची प्रगती होईल: प्रकाशचंद्र कांडपाल

मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाची व  समाजाची प्रगती होईल: प्रकाशचंद्र कांडपाल

Kandpal inaugurated the two-storied building of Savitribai Madan Kanya Niwas Rajur

अकोले | Rajur: समाजाच्या उन्नतीसाठी सी एस आर फंडाची रक्कम वापरली जात असते. राजूर येथील आदिवासी भागात सत्यनिकेतन संस्था मुला मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे समजल्या वरून आणि मुलींच्या वसतिगृहा साठी इमारत आवश्यक असल्याचे समजले. मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाची व  समाजाची प्रगती होईल हा विश्वास ठेवत आम्ही यासाठी फंडातील रक्कम दिली. यातून उभी राहिलेली दुमजली इमारत पाहून आनंद वाटला. मुलींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेला आत्मविश्वास पाहून आपण दिलेल्या रकमेचे चीज होणार असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी कांडपाल यांनी व्यक्त केला.

जीवनात जी माणसे यशस्वी झाली ती संघर्षातूनच पुढे गेलेली आहे. तुम्ही त्यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर ठेवा.प्रयत्नांची पराकाष्ठा करा. स्वतःवर विश्वास ठेवा. या गोष्टी अंगिकरल्यास जीवनात असाध्य गोष्ट साध्य करता येत असल्याचा विश्वास  स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्स चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाशचंद्र कांडपाल यांनी व्यक्त केला.

जुन्या खोल्यातून नवीन सुसज्ज अशा वसतिगृहात प्रवेश करतांना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनिंच्या चेहऱ्यावर आनंद सर्वाना भावून गेला, निमित्त होते स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्सच्या सी एस आर फंडातून उभारण्यात आलेल्या राजूर येथील श्रीमती सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या दुमजली इमारतीचे उद्घाटन कांडपाल यांच्या हस्ते झाले. या नंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड. मनोहरराव देशमुख होते.यावेळी  स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्सच्या सी एस आरच्या प्रमुख  शेफाली गज्जर खालसा, व्यवस्थापक जयीता नहा,वंदना कांडपाल,संस्थेचे पदाधिकारी व संचालक, सभासद, वसतिगृहातील मुली यावेळी उपस्थित होते.

संस्थेचे संचालक तथा पुणे येथील अभियंता अशोक मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या  मुलींसाठी या फंडातून सुमारे तेरा हजार चौरस फुटाची सर्व सोयी सुविधायुक्त असलेली इमारत उभारण्यात आली आहे.

संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक मदन यांनी या वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या मुलींना सर्व भौतिक सोयीसुविधा मिळवून देण्याबाबत आमच्याशी संपर्क साधला होता त्यांची कळकळ लक्षात घेऊन आम्ही हा निधी संस्थेस दिला आणि त्याच्या माध्यमातून एक प्रशस्त इमारत आज या ठिकाणी उभी राहिल्याचे समाधान झाल्याचा आवर्जून उल्लेख करत भविष्यात या संस्थेस शैक्षणिक कार्यासाठी मदत करणार असल्याचे कांडपाल यांनी सांगितले.

आदिवासी भागातील मुली शिकल्या पाहिजेत हा हेतू ठेवत संस्थेने हे वसतिगृह सुरू केले होते.मात्र प्रशस्त इमारत उपलब्ध नव्हती. मात्र आज या मुलींसाठी प्रशस्त इमारत उभी राहिली आहे. यात राहून मुली विचारांची देवाणघेवाण करतील आणि या माध्यमातून त्यांची शैक्षणिक प्रगती होईल हा विश्वास व्यक्त करत  फंड उपलब्ध करुन दिल्याबद्दल अध्यक्ष देशमुख यांनी स्टेट बँकेच्या जनरल इन्शुरन्सचे आभार मानले.

यावेळी जनरल इन्शुरन्सच्या शेफाली,जयीता नहा,वंदना कांडपाल यांनीही बालदिनाचे औचित्य साधून मुलींना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक मदन यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव टी एन कानवडे आणि एस टी एलमामे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर मिलिंद उमराणी यांनी आभार मानले.बँके तर्फे यावेळी निवासी मुलींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. संस्थेला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

आम्ही शेतकऱ्यांच्या मुली होणार आय पी एस…..

या वसतिगृहांत आम्ही राहणाऱ्या बहुतांशी मुली शेतकऱ्यांच्या आहोत.किरण बेदी आणि इतर उच्च पदस्थ महिलांचा आदर्श आमच्या समोर आहे म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांच्या मुलीही आय पी एस अधिकारी होणार असा विश्वास वसतिगृहातील कदम या विद्यार्थिनीने व्यक्त केला.

Web Title: Kandpal inaugurated the two-storied building of Savitribai Madan Kanya Niwas Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here