Home अकोले जिल्ह्यातील या नगरपंचायतीत येणार महिलाराज, सोडत जाहीर

जिल्ह्यातील या नगरपंचायतीत येणार महिलाराज, सोडत जाहीर

Mahila Raj will come to Akole Nagar Panchayat 

अकोले | Akole Nagar Panchayat: अकोले नगर पंचायतच्या १७ प्रभाग आरक्षण पुनर्सोडत सोमवारी सकाळी उप विभागीय संगमनेर येथील अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व अकोले नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विक्रम जगदाळे यांनी अकोले पंचायत समितीत सभागृहात जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अनेक प्रभाग हे महिला राखीव झाल्याने राजकीय मनसुब्यावर पाणी फिरले आहे.काही इच्छुकांना इच्छित प्रभागातून अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण आल्याने हिरमोड झाला आहे. १७ प्रभागापैकी ९ प्रभाग महिला राखीव झाल्याने नगरपंचायतील १७ पैकी ९ महिला आरक्षण सोडतीत जाहीर केल्याने नगरपंचायतीत ५० टक्केपेक्षा अधिक जागा मिळतील. यामुळे अनेकांकडून नाक मुरडण्यात आले आहे. तरीदेखील येथे खऱ्या अर्थाने महिलाराज येणार असल्याने महिलांमधून आनंद व्यक्त होत आहे.

यावेळी पंचायत समिती सभागृहात लहान मुलांचे हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली .एकुण 17 प्रभागात अनु.जाती -1 अनु जमाती -1.नागरीकांचा मागास प्रवर्ग 2 नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला 2,सर्वसाधारण 6 सर्वसाधारण महिला 5 असे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये 50 टक्के महिला म्हणजे 9 महिला सदस्य यांचे प्रभाग राखीव झाले आहेत.

सुरूवातीला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीचे सदस्य पूर्वी पुरुष असल्याने महिला करण्यात आले तर दोन नंबरची अनु.जाती जमातीचे मतदार असलेली प्रभागात म्हणजेच प्रभाग क्र 6 मध्ये अनुसूचीत जाती महिला व प्रभाग 16 मध्ये अनुसूचीत जमाती आरक्षण ठेवण्यात आले तर नंतर राहिलेल्या प्रभागातून नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती च्या दोन जागा भुपेष चौधरी या मुलांचे हस्ते काढण्यात आल्या व नंतर मागीलवेळी महिला आरक्षण असलेले प्रभाग वेगळे करुन राहिलेल्या प्रभागातून नागरिकांचा प्रवर्ग महीला चे दोन जागा कुमारी समिक्षा लोहटे या मुलीच्या हस्ते काढण्यात आले. तर एकुण आरक्षणात महिलांना 50 टक्के आरक्षणात अनु.जाती,जमाती,व ना.म.प्र.अश्या 4 महिला संख्या झाल्याने राहिलेले 11 प्रभागातून 5 महिला आरक्षित करण्याचे असल्याने त्यातून पूर्वी महीला आरक्षण असलेली बाजूला काढल्याने 4 प्रभाग आरक्षित झाले मात्र एक महिला आरक्षण हे मागील वर्षी महिला आरक्षण असलेल्या जागी पुन्हा येणार असल्याने 7 प्रभागाच्या चिठ्ठीतून कुमारी समृद्धी अनिल शिंदे या मुलीने चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले .

अनपेक्षित आरक्षणाने अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. निवडणूक कर्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण चित्र समोर येणार आहे.

Web Title: Mahila Raj will come to Akole Nagar Panchayat 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here