Home Accident News कंटेनर व टेम्पोची समोरसमोर धडक, दोन ठार

कंटेनर व टेम्पोची समोरसमोर धडक, दोन ठार

Karjat Chincholi phata Tempo and container Accident Two death

कर्जत | Karjat : कर्जत तालुक्यातील चिचोली फाटा येथे कंटेनर व टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

कर्जत नगर रस्त्यावर रुंदीकरण व मजबुतीकरण राजपथ बांधकाम कंपनीचे काम सुरु आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास टेम्पोमध्ये सिमेंट घेऊन सहा कामगार कर्जतकडून मिरजगावकडे जात असताना श्रीगोंदेकडून येत असलेल्या भरधाव कंटेनरने तालुक्यातील चिंचोली फाटा येथे चौफुलीवर त्या टेम्पोस जोरदार धडक दिली. यामध्ये दादासाहेब मिरेकर (ता.मेहकर जि. बुलढाणा), भवानी नागेंद्र जोंधळे (ता. श्रीगोंदा जिल्हा आदिलाबाद) हे दोघे जण जागीच ठार झाले. तर यातील आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून तो पकडला. या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भेट दिली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Karjat Chincholi phata Tempo and container Accident Two death

Get See:  Latest Marathi News

संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here