ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घुसून महिला ग्रामसेवकास मारहाण
Ahmednagar News Live | कर्जत | Karjat Crime : तालुक्यातील कापरेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घुसून महिला ग्रामसेवकास मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांवर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापरेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ग्रामसेविका म्हणून अरुणा भगवान गलांडे या कार्यरत आहेत. 31 डिसेंबर या दिवशी श्रीमती गलांडे या नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत होत्या. त्यावेळी गावामधील संतोष संभाजी गायकवाड व राणी संतोष गायकवाड हे दोघे जण आले आणि तुम्ही आम्हाला नेहमी त्रास का देता असे म्हणत अरुणा गलांडे यांना त्यांनी मारहाण केली. तसेच कार्यालयातील कागदपत्रे फाडण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सोडवले. या घटनेचा कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेने निषेध केला आहे.
या घटनेनंतर ग्रामसेविका अरुणा गलांडे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमधील याबाबत लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून एक जानेवारी या दिवशी , संतोष संभाजी गायकवाड व राणी संतोष गायकवाड यांच्याविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Karjat Crime Gram Sevak beaten after breaking into Gram Panchayat