Home महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णवाढीचा सिलसिला कायम, आज इतके वाढले ओमायक्रॉनचे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा सिलसिला कायम, आज इतके वाढले ओमायक्रॉनचे रुग्ण

Maharashtra Corona Update Today 11877

Maharashtra Corona Update :  राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संखेत चांगलीच वाढ होत आहे.  आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 11 हजार 877 रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संखेत झपाट्याने वाढ होत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी 2 हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापार्यंत 65 लाख 12 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज 11 हजार 877 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४२,०२४ रुग्ण उपचार घेत  आहेत.

राज्यात आज 50 ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Patient Today 50)

आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत.  आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत

Mumbai Corona Update: मुंबईत आज 8 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाही मृत्यूची नोंद नाही. याशिवाय, 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 376 वर पोहचलीय. रुग्ण बरे होण्याचा दर  94 टक्क्यांवर पोहोचला आहे.  मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रीय आहेत.

Web Title: Maharashtra Corona Update Today 11877

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here