Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी केल्या चार ठिकाणी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी केल्या चार ठिकाणी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

Theft broke into four places in Sangamner taluka

Ahmednagar News | Sangamner theft | संगमनेर: संगमनेर तालुक्यात वडगाव पान फाटा शिवारात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या (Theft) करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. 

वडगाव फाटा परिसरात रात्रीच्या वेळी चार ठिकाणी घरफोड्या करीत लाखोंचा ऐवज लंपास केला. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास वडगाव पान फाटा शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार ठिकाणी घरफोड्या केल्या. फाट्या जवळ पेट्रोल पंपाजवळ राहणारे संजय माधव थोरात यांच्या घराची घरफोडी करीत स्वाती जयराम थोरात यांच्या कानातले व गळ्यातील सोने लंपास केले. सदर ठिकाणाहून दीड तोळे सोने व रोकड  लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्रमोद शिवाजी थोरात व  गणेश संपत थोरात यांच्या घराकडे वळविला. मात्र त्याठिकाणी चोरट्यांचा हातात ऐवज लागला नाही. तोपर्यंत नागरिक जागे झाले होते.

वडगाव पान परिसरात राहणारे बाळासाहेब दत्तात्रय थोरात यांच्या घरी देखील चोरट्यांनी घरफोडी केली. साडे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच ४० हजाराची रोकड लंपास केली. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी कडी कोंडे तोडून रात्रीच्या वेळी घरफोड्या करीत लाखोंचा ऐवज लांबविला. यावेळी स्थानिक नागरिक जागे झाले अन तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. 

Web Title: Theft broke into four places in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here