Home Accident News कंटेनरला मागून कारने जोराची धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर तिघे...

कंटेनरला मागून कारने जोराची धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर तिघे जखमी  

Nevasa Accident car hit the container from behind

Ahmednagar News Live | Nevasa Accident | नेवासा: अहमदनगर-पुणे महामार्गावर नेवासा फाटा येथे कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकल्याने अपघात घडला. या अपघातात कारचा पुढील भाग चेपला गेला असून  दोन जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी पहाटे घडला.

या अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय 65 रा. वाघोदे, ता.रावेर जिल्हा जळगाव) व आकाश प्रकाश सांगेले (वय 28 रा. थोरगव्हाण, ता.रावेर, जि.जळगाव) हे जागीच ठार झाले.तर कल्पेश विनोदचंद पाटील (वय 35), भूमिका कल्पेश पाटील (वय 6, रा वलसाड, गुजरात) व सुलभा गजेंद्र कोलते (वय 55) हे तिघे जखमी झाले आहेत. रावेरमधून कोलते व सांगेले कुटुंबीय पुण्यातील भाच्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने पुण्याला निघाले होते. औरंगाबाद-पुणे महामार्गावरून जात असताना रविवारी पहाटे नेवासा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. नेवासा फाटा येथील चौकात गतीरोधकाचा अंदाज न आल्याने जवळ आल्यावर वाहने अचानक थांबवली जातात. अशाच पद्धतीने अचानक थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. या अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

Web Title: Nevasa Accident car hit the container from behind

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here