Home अहमदनगर कोपरगाव शहरातील पुलाखाली गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

कोपरगाव शहरातील पुलाखाली गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

Dead body in Godavari river basin under bridge in Kopargaon city

Ahmednagar News Live | Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव शहरातील छोट्या पुलाखाली गोदावरी नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह (Dead body)आढळून आल्याने शहारात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी मोर्निग वाकला जाणाऱ्या नागरिकांना पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक देसले यांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक देसले यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक पोलीस भरत दाते, कॉन्स्टेबल ताजने, शिंदे यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तर मृतदेहाची ओळख पटली नसून सदर इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असावे. तसेच त्याने निळ्या रंगाची पँँट व लाल रंगाचा टी शर्ट  घातलेला आहे. सदर पुरुषास कोणी ओळखत असल्यास कोपरगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. मृतदेह बाहेर काढत असताना नागरिकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनी वेळीच पोहोचून पुलावरील गर्दी कमी करून वाहतूक सुरळीत केली. 

Web Title: Dead body in Godavari river basin under bridge in Kopargaon city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here