Home अहमदनगर दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा पाण्यामध्ये बुडवून निर्घुणपणे खून, अहमदनगर येथील संशयास्पद...

दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा पाण्यामध्ये बुडवून निर्घुणपणे खून, अहमदनगर येथील संशयास्पद घटना

Karjat Crime News suspicious incident in ahmednagar two friends murder a close friend

Ahmednagar | Karjat Crime News | अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे वय 35 वर्ष, या युवकाचा त्याचे दोन मित्र आनंद बबन पर हर व जावेद अरबाज शेख राहणार पिंपळवाडी यांनी कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये बुडवून निर्घुणपणे खून (murder) करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये महेश अंकुश पोटरे राहणार पिंपळवाडी यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश अंकुष पोटरे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले आहे की, 23 जानेवारी या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नितीन पोटरे घरांमधून मी आनंद परहर, व जावेद शेख या दोन मित्रांकडे जाऊन येतो असे म्हणून घराच्या बाहेर पडला, मात्र तो घरी परत आलाच नाही, रात्री उशिरा घरातील नातेवाईक मयत नितीन यास फोन करत होते परंतु त्याचा फोनही लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोटरे व इतर नातेवाईकांनी नितीन याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.

दरम्यान जावेद शेख यांनी नितीन याची मोटरसायकल घरी आणून लावली व सांगितले की, मी नितीन व आनंद हे तिघेजण रात्री बरोबरच होतो, आम्ही तिघेही दारू पिलो होतो मात्र मी नितीन ची गाडी घेऊन पुढे आलो असून खूप दारू पिला असल्यामुळे तो आनंद परहर याच्यासोबत होता मला काही माहिती नाही.

यानंतर याप्रकरणी आनंद परहर यास विचारणा केली असता त्याने सांगितले की रात्री नऊ वाजता मी नितीन यास जावेद शेख यांच्या घराजवळ सोडले आहे . तिथून पुढे तो कुठे गेला मला माहिती नाही. यानंतर नातेवाइकांनी नितीन आनंद परहर व जावेद शेख यांच्यासोबत गेला होता तो घरी परत आला नाही अशी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती.

Web Title: Karjat Crime News suspicious incident in ahmednagar two friends murder a close friend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here