Home अकोले अकोले नगराध्यक्षपद आरक्षण सोडत जाहीर, यांची लागणार वर्णी?

अकोले नगराध्यक्षपद आरक्षण सोडत जाहीर, यांची लागणार वर्णी?

Nagar Panchayat Election Akole announces leaving the mayoral reservation

Nagar Panchayat Election | अकोले | अलताफ शेख: आज मंत्रालयात राज्यातील १३५ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये नुकतीच निवडणूक पार पडलेल्या अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे सर्वसाधारणजनरल आरक्षण निघाले आहे.

अकोले नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच होऊन १२ जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे यामुळे भाजपाचीच सत्ता नगरपंचायत वर आली हे निश्चित झाले मात्र एस.सी प्रभागात मात्र राष्ट्रवादी कॅाग्रेसचे उमेदवार श्वेताली मिलिंद रुपवते (घोलप) या विजयी झाल्याने सर्वपक्षीयासह तालुक्याचे लक्ष नगराध्यक्ष पद आरक्षणाकडे लागले होते. आज गुरूवारी दुपारी ४ वा मंत्रालय मुंबई येथे राज्यातील १३५ नगरपंचायत नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत काढण्यात आली .कोविड प्रादुर्भाव सुरु असल्याने या सोडतीचे दूरदृष्यप्रणाली (V C ) द्वारे विभागीय आयुक्तालयात आयोजित केले होते. यावेळी  चिठ्ठी द्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण (जनरल) निघाले आहे. आता भाजपाचीच सत्ता असल्याने नगराध्यक्ष भाजपाचाच होणार हे निश्चित झाले असुन यापदासाठी भाजपामधुन बाळासाहेब वडजे यांची निवड होण्याची शक्यता आहे. तसे या पदासाठी भाजपाचे नगरसेविका सोनालीताई नाईकवाडी, प्रतिभाताई मनकर ही इच्छुक आहेत मात्र आता माजी मंत्री मधुकरराव पिचड, मा.आ.वैभवराव पिचड हे कोणाला पसंती देतात यानंतर कळेल मात्र अनुभवी कर्तुत्वसंपन्न म्हणून बाळासाहेब वडजे यांचीच वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे .

Web Title: Nagar Panchayat Election Akole announces leaving the mayoral reservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here