Home संगमनेर संगमनेरसह सर्वत्र चर्चा: बैलावर अंत्यसंस्कार करून दशक्रीयासह तेरावा विधी, महाराजांचे प्रवचन

संगमनेरसह सर्वत्र चर्चा: बैलावर अंत्यसंस्कार करून दशक्रीयासह तेरावा विधी, महाराजांचे प्रवचन

Sangamner Thirteenth ritual with Dasakriya by cremation on bull

Sangamner | संगमनेर: व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार व दहावा तेरावा विधी करण्याचा रिवाज आहे. त्या त्या धर्माच्या रितीरिवाजानुसार विधी केले जात असतात. परंतु प्राण्यांवरही आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून प्रेम करणाऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या भाग्या बैलावर अंत्यसंस्कार करून दशक्रिया, तेरावा विधीही केला आहे. दशक्रियेत महाराजांचे प्रवचन करण्यात आल्याने या प्रकारची सर्वत्र चर्चा होत आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव अंतर्गत धादवाडी येथील पशुपालक महादू मारुती खराटे याच्याकडे भाग्या आणि राजा नावाची बैल जोडी आहे. खराटे कुटुंबाच्या प्रगतीपथावर या बैलजोडीचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या साथीने बिकट परिस्थितून प्रगती करण्यात महत्वाचा वाटा आहे. ते या जोडीला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम व लाड करत असतं. बैल पोळ्याच्या सणाला सजावट करून वाजत गाजत मिरवणूक काढून मान दिला जात असत. मात्र मात्र नियतीने लाडक्या भाग्याला कुटुंबातून हिरावून नेले.

गेल्या १३ दिवसांपूर्वी भाग्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. दशक्रिया व तेरावा विधी करण्यात आला. मनोहर महाराज खराटे यांचे प्रवचन देण्यात आले. त्यांनी प्रवचनातून भूत दया गायी पशुंचे पालन उक्तीनुसार उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थिताना भोजन देण्यात आले. यावेळी सर्व जण भावूक होऊन डोळ्यातून अश्रू वाहत होते. या विधीची राज्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

“भाग्या” आमच्या कुटुंबातील लाडका सदस्य होता. त्याच्या प्रेमापोटी सर्व विधी करण्यात आले. – पशुपालक महादू खराटे

Web Title: Sangamner Thirteenth ritual with Dasakriya by cremation on bull

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here