Home अहमदनगर एका इंजेक्शनसाठी चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरवा मात्र

एका इंजेक्शनसाठी चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरवा मात्र

Karjat Follow up with four ministers and seven MLAs for one injection

कर्जत | Karjat: कोरोनावर प्रभावी ठरत असलेले एक इंजेक्शनसाठी तब्बल चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरावा केला मात्र एकानेही दखल न घेतल्याने दुर्दैवाने कर्जत तालुक्यातील एका पत्रकाराच्या पत्नीचा मृत्यू झाला. याबबत कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी खेद व्यक्त केला आहे.

मिरजगाव येथील पत्रकार विनायक चव्हाण यांच्या पत्नी वैशाली चव्हाण यांचे अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने निधन झाले. वैशाली चव्हाण यांच्यावर उपचार सुरु असताना कोरोनाबाबत आवश्यक असलेले एक इंजेक्शन उपलब्ध करण्यास सांगितले. यासाठी विनायक चव्हाण यांच्या प्रिंट मिडिया व इलेक्ट्रोनिक मेडीयातील मित्र परिवाराने चार मंत्री व कर्जतचे जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह सात आमदारांकडे एका इंजेक्शनसाठी पाठपुरावा केला होता पण कोणाकडूनही इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटने बाबत कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी खंत व्यक्त केली आहे.

Web Title: Karjat Follow up with four ministers and seven MLAs for one injection

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here