Home अहमदनगर अहमदनगर: ज्वारीच्या पिकात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर: ज्वारीच्या पिकात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Karjat Murder woman's body found in sorghum crop

Ahmednagar | Karjat | अहमदनगर: कर्जत तालुक्यातील परीटवाडी शिवारात एका ज्वारीच्या पिकात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  कमलाबाई चांगदेव वाघ (वय ७५, रा. परीटवाडी) यांचा मृतदेह (dead body)डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत मिळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या पूर्वी उघडकीस आली.

कर्जत तालुक्यातील परीटवाडी शिवारात एका वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून (Murder) करण्यात आला. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात रामदास चांगदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, दिनकर मुंडे यांनी भेट दिली असून अधिक  तपास सुरू केला आहे.

Web Title: Karjat Murder woman’s body found in sorghum crop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here