Home अहमदनगर अहमदनगर: साखर कारखान्यात भीषण स्फोट, कोटींचे नुकसान

अहमदनगर: साखर कारखान्यात भीषण स्फोट, कोटींचे नुकसान

Shrigonda Massive explosion in sugar factory, loss of crores

Ahmednagar | Shrigonda | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात मोठा अपघात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.  गुरवारी या कारखान्यात मोठा अपघात झाला. यात सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे कारखाना हा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकी तापमान वाढून फुटल्याने जवळपास 4  हजार टन मळी वाहून गेल्याची घटना घडली आहे.  गुरुवारी (ता. 10) पहाटे ही घटना घडली.

टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,  या टाकीची साठवणक्षमता साडेचार हजार टन असून, तिच्यात  4 हजार 100 टन मळी साठविली होती. टाकी फुटल्याने ही मळी वाहून गेली. टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत कोसळली. कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.  शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Shrigonda Massive explosion in sugar factory, loss of crores

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here