Home अहमदनगर येरवाडा जेलमधून गज कापून पसार झालेला आरोपी कर्जत पोलिसांच्या ताब्यात

येरवाडा जेलमधून गज कापून पसार झालेला आरोपी कर्जत पोलिसांच्या ताब्यात

Karjat police arrested the accused

कर्जत | karjat: येरवाडा जेलचे गज कापून पसार झालेला आरोपी कर्जत पोलिसांनी जेरबंद केला आहे. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात या आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आले आहे. कर्जत पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त खबर्याकडून माहिती मिळाली की, येरवाडा कारागृहातून गज कापून पळून गेलेला आरोपी अनिल विठ्ठल वेताळ वय २२ हा कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात येणार असल्याची माहिती समजली.

ही माहिती मिळताच जाधव यांनी पथकास सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास राक्षसवाडी शिवारात माळरानावर सापाला रचून आरोपी अनिल वेताळ यास ताब्यात घेण्यात आले. या आरोपीवर पुणे जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी असे अन्य गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हा येरवाडा कारागृहातून पसार झाल्याने त्याच्यावर कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.  

Web Title: Karjat police arrested the accused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here