Home महाराष्ट्र तरुणाने प्रेयसीवर गोळ्या झाडून हत्या तर स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या

तरुणाने प्रेयसीवर गोळ्या झाडून हत्या तर स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या

Murder his girlfriend by shooting himself and commits suicide 

मुंबई: प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरल्याच्या रागातून तरुणीची हत्या करत २५ वर्षीय तरुणाने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री मालाड येथे घडली.

निधी मिश्रा वय २२ असे या मयत तरुणीचे नाव आहे तर राहुल यादव वय २५ असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

निधी मिश्रा ही मालाड येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होती. ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. राहुल हा कांदिवलीतील लालजीपाडा भागात त्याच्या काकाकडे राहत होता.

एका मित्राच्या माध्यामातून ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या चार वर्षापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र राहुल हा गुन्हेगारी कडे वळल्याने निधीने त्याच्याशी विवाह करणे टाळले व कुटुंबीयांनी जुळविलेल्या मुलाशी लग्न करण्यास संमती दिली. त्यावरून तिचा साखरपुडा पार पडला.

या काळात राहुल व तिची भेट होत होती. राहुल हा तिला कंपनीतून घरी सोडण्यास येत होता. सोमवारी सायंकाळी तो दुचाकीवरून निधीला मालाड मधील इजामिना टावर येथे घेऊन आला. त्यांनी तेथे खाद्यपदार्थ घेतले. मात्र तेथेच राहुलने गावठी पिस्तुलातून निधीवर गोळी झाडली. तसेच स्वतः वर गोळी झाडत आपले जीवन संपविले अशी माहिती पोलिसांनी दिली.

सहायक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे यांनी दिलेल्या माहिती नुसार राहुलवर खंडणी, चोरी, मारहाणीचे गुन्हे दाखल होते.  

Web Title: Murder his girlfriend by shooting himself and commits suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here