Home अहमदनगर रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला

Karjat Police caught a pickup of ration rice going to the black market

कर्जत | karjat: रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. अमोल जयसिंगकर रा. देशमुखवाडी ता. कर्जत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कर्जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राशीन करमाळा रस्त्यावर कर्जतच्या उप जिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बोलेरो कंपनीची एम. एच. ४२ ए. क़्यु. ६१५७ ही पिक अप पोलिसांना संशियीत आढळून आली. पोलिसांनी वाहनात प्रत्येकी ५० किलो वजनाच्या व १० हजार किमतीच्या सुमारे १० गोण्या आढळून आल्या आहेत.

पोलिसांनी संबंधित तांदूळ व ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.  

Web Title: Karjat Police caught a pickup of ration rice going to the black market

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here