Home कर्जत दुर्दैवी घटना: दोन मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना: दोन मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू

Karjat Two children drown in Sina river

कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील रातंजन येथे नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

तेजस सुनील काळे वय १५ आणि सिद्धार्थ विजय काळे असे या दोन मयत मुलांची नावे आहेत. सीना नदीत अफाट प्रमाणात वाळू उपसा झाल्याने याठिकाणी मोठमोठे खडडे पडले आहेत. सीना नदीला बरयाच दिवसांनी नदी वाहती झाल्याने ही दोन मुले पोहोण्यासाठी नदीवर गेली असल्याने त्यांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाली.

गावातील काही तरुणांनी सुमारे अर्धा तास शोध घेत मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. दोन वर्ष झाले तेव्हा अशाच प्रकारे या गावात घटना घडली होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Karjat Two children drown in Sina river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here