Home अकोले Akole: अकोले तालुक्यात करोनाचे द्विशतक, आणखी चार

Akole: अकोले तालुक्यात करोनाचे द्विशतक, आणखी चार

Akole taluka 200 patient coronaviruses

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शनिवारी आणखी चार करोनाबाधित आढळून आल्याने करोना रुग्णांचे द्विशतक पार झाले आहे. कालच तालुक्यात १९ करोनाबाधित आढळून आल्याने हादरा बसला होता. 

शनिवारी सकाळी खानापूर कोविड सेंटर येथे ६४ व्यक्तींच्या टेस्ट घेण्यात आल्यात या टेस्टमध्ये तालुक्यातील देवठाण येथील दोन तर म्हाळादेवी येथील दोन अशा चार करोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत. यामध्ये देवठाण येथील २२ वर्षीय दोन तरुण तर म्हाळादेवी३० वर्षीय पुरुष व ३ वर्षीय बालकाला करोनाची लागण झाली आहे. 

तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २०० झाली आहे. त्यामधील १५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. चार मयत तर ४४ व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहेत. 

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka 200 patient coronaviruses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here