Home अहमदनगर Karjat: दोन मोबाईल चोर अटकेत

Karjat: दोन मोबाईल चोर अटकेत

Karjat Two mobile thieves arrested

कर्जत | Karjat: कर्जत येथे रात्रीच्या वेळी घरासमोर झोपलेल्या लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अविनाश बाळासाहेब घालमे वय २० व रोहित दीपक काळे वय १९ दोघेही रा. शिंदा ता. कर्जत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती गणपत चव्हाण (वय ३१ रा. चव्हाण मळा, जामदार वाडा कर्जत) हे घरासमोर झोपलेले असताना १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा अविनाश घालमे याने त्याच्या साथीदारसोबत केला असल्याचे माहिती एलसीबीचे पीआय अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पथकाने घालमे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा सोन्या काळे याच्यासोबत केल्याची कबुली दिली. त्यानुसार काळे याला सापळा रचून पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांनी चोरलेला मोबाईल काढून दिला. त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

Web Title: Karjat Two mobile thieves arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here