Home अहमदनगर Suicide: महिलेची विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या

Suicide: महिलेची विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या

Karjat Woman commits suicide by jumping into well

कर्जत | Karjat Suicide Case: नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली आहे. उषा बापू कळसाईत ( वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत विलास रामचंद्र कावरे रा. धानोरा ता. जामखेड यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की , कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील बापू बबन कळसाईत याच्यासोबत त्यांची मुलगी उषा तिचा विवाह झाला. मात्र विवाहानंतर तिचा पती बापू कळसाईत हा कायमदारू पिऊन मारहाण करीत असे तसेच शारीरिक व मानसिक त्रास देत असे. अखेर या सर्व जाचास कंटाळून तिने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बापू कळसाईत याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Karjat Woman commits suicide by jumping into well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here