Home अहमदनगर शिर्डीत बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बाँम्बशोधक पथक दाखल

शिर्डीत बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बाँम्बशोधक पथक दाखल

Ahmednagar finding unattended bag in Shirdi

शिर्डी |Ahmednagar  | Shirdi News:  आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरात नाताळनिमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातून साईभक्तांची मोठी गर्दी होत आहे.  रविवार दि. 26 रोजी जुन्या पिपळवाडी रोडलगत असलेल्या दर्शन रांगेजवळ बेवारस बॅग आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी बाँम्बशोधक पथक दाखल होऊन तपासणी केल्यानंतर सदर बॅगेत काही आढळले नाही. त्यामुळे साईभक्तांनी सुटकेचा श्वास सोडला. उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.

याबाबत चर्चा वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी साईसंस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच पोलीस आणि बाँम्बशोधक पथक दाखल झाले होते. बॉम्बशोधक पथकाने या बेवारस बॅगची तपासणी केल्यानंतर बॅगच्या आतमध्ये काहीही आढळून न आल्याने उपस्थित पोलीस, साईभक्तांसह ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आणि पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण झाली. या बेवारस बॅगची शिर्डीत व साई भक्तांमध्ये दिवसभर चर्चा रंगली होती. काही काळ साईभक्तांंमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

Web Title: Ahmednagar finding unattended bag in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here