Home अहमदनगर दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण

Rahuri Crime News beat his wife with a wooden stick for not paying for alcohol

राहुरी | Crime News | Rahuri: दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीला लाकडी दांड्याने व मारहाण केल्याची घटना घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली. राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पत्नीवर उपचार सुरु आहेत.

जखमी मंदा नारायण चव्हाण रा. मोमीन आखाडा ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, २४ डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास आरोपी त्यांचा पती नारायण बाजीराव चव्हाण याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी मंदा चव्हाण यांनी पैसे दिले नाही. याचाच राग आल्याने नारायण याने पत्नी मंदा हिला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. मंदा हिने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी मारहाण व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार संतोष राठोड करीत आहे.

Web Title: Rahuri Crime News beat his wife with a wooden stick for not paying for alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here