Home Accident News संगमनेर: डंपरच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू

संगमनेर: डंपरच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू

Sangamner Accident Two-wheeler killed in dumper collision  

संगमनेर | Accident | Sangamner: भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मंगळापूर फाटा ते अकोले संगमनेर रस्त्यावर हा अपघात घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज कारभारी नागरे वय ३१ रा. दरेवाडी ता. संगमनेर असे या अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. त्यांचे बंधू राहुल कारभारी नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. के. भांगरे हे करीत आहे.

तसेच रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिखली गावाच्या पुढे संगमनेर अकोले रोडवर मालट्रकला ओव्हरटेक करीत असताना दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात घडला. या अपघात दोन्ही मोटारसायकलवरील चालक गंभीर जखमी झाले आहे. रस्त्याचे काम सुरु आणि उसाची वाहतूक यामुळे वाहनचालकांची मोठी कोंडी होत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sangamner Accident Two-wheeler killed in dumper collision  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here