Home अहमदनगर प्रवासी महिलेस चालू बसमध्ये लाखो रुपयांना लुटले

प्रवासी महिलेस चालू बसमध्ये लाखो रुपयांना लुटले

Karjat woman was robbed of lakhs of rupees in a running bus

कर्जत | Karjat: तालुक्यात नुकत्याच गेल्या काही दिवसांत तालुक्यात प्रवाशांना लुटणाऱ्या महिलेला अटक करण्यात होती. आता पुन्हा एकदा महिलांना लुटणाऱ्या चोरट्या महिला हातचलाखी करत लुटण्याचे काम करीत आहे. अशीच एक घटना घडली प्रवासादरम्यान लाखो रुपयांचा मुद्देमाल चालू बसमधून लंपास केल्याची घटना घडली आहे.

कल्याण औरंगाबाद या बसने प्रवास करीत असणाऱ्या एका प्रवासी महिलेसोबत प्रकार घडला आहे. ही घटना घोडेगाव ते नेवासाफाटा या दरम्यानच्या प्रवासात घडली.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सिंधुबाई लक्ष्मण खाजेकर वय ६५ रा. लासूर नाका गंगापूर जि. औरंगाबाद या महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी महिला व त्यांचा नातू ३ जानेवारी रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास कल्याण ते औरंगाबाद बसने (एम.एच.१४ बी.टी. ३०३१) गंगापूर येथे येण्यासाठी निघालो.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घोडेगाव येथून सदर बस मध्ये चार महिला व त्यांचे लहान मुले असे माझ्या शेजारी येऊन उभी राहिले. त्यातील एक माझ्या शेजारी बसली होती. तिच्याजवळ लहान मुल होते. एक महिला माझ्या बॅगजवळ बसली होती. ह्या महिला नेवासा फाटा येथे बसमधून उतरून निघून गेल्या.

त्यानंतर फिर्यादी महिला औरंगाबाद हायवे रोडवर गंगापूर फाटा येथे उतरले. तेथून त्या रिक्षाने घरी गेले असता बॅगमधील सामान बाहेर काढीत असताना बॅगच्या आतील बाजूस कापलेले दिसले.

बॅगमध्ये असणारा प्लास्टिक डबा आढळून आला नाही, २० हजार रुपयांची प्लास्टिकची पिशवी दिसली नाही. बॅगेत पाच तोळे सोन्याचे दागिने होते. हे सर्व चोरी गेल्याचे लक्षात आल्याने नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोमनाथ कुंडारे हे करीत आहे.

जाहीर नम्र विनंती: 

नवीन फिचर वापरण्यासाठी आजच आपला संगमनेर अकोले न्यूज अॅप अपडेट करा. अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Web Title: Karjat woman was robbed of lakhs of rupees in a running bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here