Home क्राईम धक्कादायक! शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकांना फसवून केले कृत्य

धक्कादायक! शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकांना फसवून केले कृत्य

Pune Crime: ९ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual assault ) केल्याची धक्कादायक घटना.

Khed Sexual assault on school girl

पुणे:  पुण्यातील खेड तालुक्यातून एक संतापजनक व धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ९ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार र करण्यात आला आहे. पीडिता शाळेत असताना तिला खोटं सांगून हॉटेलवर नेण्यात आले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पुन्हा शाळेत सोडण्यात आले. सदर घटनेत राजगुरुनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत (School) पीडित चिमुकली शिकत आहे. तिचे वडिल खेडयेथे तिला बोलवत आहेत असे सांगून एका व्यक्तीने तिला शाळेतून बाहेर आणले. त्यानंतर जवळच्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नंतर या नराधमाने चिमुकलीला पुन्हा शाळेत सोडले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शाळेच्या ताब्यात असताना ही घटना घडल्याने शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळेतून घरी गेल्यावर चिमुकलीने घडलेली घटना आई बाबांना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने राजगुरुनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण सोनबा राक्षे असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Khed Sexual assault on school girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here