Home अहमदनगर पोलीस ठाण्याच्या आवारात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलीस ठाण्याच्या आवारात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Ahmednagar Rahuri:   पोलिस ठाण्याच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल सदृश पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.

Two attempted self-immolation in the premises of the police station

राहुरी:  राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील धर्मांतर प्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तडकाफडकी बदली केल्याचे समजताच संतप्त झालेल्या सर्वपक्षीय व सर्व संघटना, नागरिकांच्या वतीने आज शनिवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी विधानभवनात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांची काल तडकाफडकी अहमदनगर येथील मुख्यालयात बदली करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ काल दुपारी चार वाजेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे व सचिन साळवे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल सदृश पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात धावपळ उडाली होती. पोलीसांनी वेळी हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतले.

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी धर्मांतराचं एक प्रकरण घडले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी यात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचं आरोप नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमार्फत 15 दिवसांत चौकशी केली जाईल. तोपर्यंत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची आजच नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल, असं प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हेगारीवर वचक राखण्यात यश आले होते. राहुरीतल्या महाविद्यालयीन मुलींची जर कोणी छेड काढत असेल तर संबंधित मुलींनी पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पो. नि. दराडे केले होते.

पो. नि. दराडे यांनी यासाठी तयार केलेली चित्रफित समाज माध्यमावर प्रसारीत केली होती. त्या चित्रफितीला पसंती मिळाली होती. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध धंद्यावरही पो . नि . दराडे यांची करडी नजर टाकत कारवाईचा धडका सुरू होता. तोच दराडे यांच्या अचानक तडकाफडकी बदलीची चर्चा येऊन धडकताच राहुरी तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे आज सर्वपक्षीय राहुरीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आ

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Two attempted self-immolation in the premises of the police station

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here