Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन दोन मुलींचे अपहरण , बांधकाम इमारतीत ठेवले डांबून

अहमदनगर: अल्पवयीन दोन मुलींचे अपहरण , बांधकाम इमारतीत ठेवले डांबून

Kidnap of two minor girls

Shevgaon | शेवगाव: शेवगाव नेवासा रस्त्यावरून आपल्या आईकडे जात असलेल्या दोन मुलींचे मंगळवारी सायंकाळी अपहारण (Kidnap) झाले. अल्पवयीन मुलीना एक १० वर्ष व १३ वर्ष यांना कार मधून पळवून घेऊन जाऊन बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी कार्तिक राजेंद्र काळे वय २० रा. आयशानगर शेवगाव याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अपहरण झालेल्या मुलींची सुटका करण्यात आली असून आरोपीस अटक करणयात आली आहे.

वाचा: Ahmednagar News

शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या दोन मुली शेवगाव नेवासा रस्त्याने आईकडे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पायी जात असताना आरोपी कार्तिक राजेंद्र काळे याने दोन्ही मुलीना टेरेनो कारमध्ये बसवून घेऊन निघून गेला.

हॉस्पिटलमध्ये गेलेली महिला घरी आल्यानंतर तिला आपल्या घरी नसल्याचे समजले. त्यांनंतर महिलेने पतीसह मुलींचा शोध घेतला असता मुली मिळून  आल्या नाही.

सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास अपहरण झालेल्या मुली लांडे वस्ती जवळ बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावर बांधून ठेवल्याची माहिती अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईक यांना समजली.

त्यांनी सदरील ठिकाणी जाऊन मुलींची सुटका करीत आरोपी कार्तिक राजेंद काळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीने मुलींचे अपहरण कशासाठी केले याचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Kidnap of two minor girls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here