Home अहमदनगर अहमदनगर: चार चाकी वाहनातून अपहरण करून डांबून ठेवले अन….

अहमदनगर: चार चाकी वाहनातून अपहरण करून डांबून ठेवले अन….

Ahmednagar crime | Jamkhed News:  चार चाकी वाहनातून जामखेड येथून कर्जत येथे पळवून नेऊन दुकानात डांबून ठेवले (Kidnapped). अन मारहाण तसेच शंभर रुपयांच्या बॉण्डवर नोटरी करून कोऱ्या चेकवर सह्या घेऊन मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

Kidnapped from a four-wheeler and parked Crime Filed

जामखेड: चार चाकी वाहनातून जामखेड येथून कर्जत येथे पळवून नेऊन दुकानात डांबून ठेवले. अन मारहाण तसेच शंभर रुपयांच्या बॉण्डवर नोटरी करून कोऱ्या चेकवर सह्या घेऊन मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

चारचाकी गाडीत घालून जामखेड येथून कर्जत येथे पळवून नेऊन फिर्यादीस दुकानात डांबून ठेवले. तिथे पाइपने मारहाणही करण्यात आली. फिर्यादीस शंभर रुपयांच्या बॉण्डवर नोटरी करून कोऱ्या चेकवर सह्या घेऊन मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिन्ही आरोपी फरार आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ९ जानेवारीला सकाळी साडेसहा वाजता फिर्यादी म्हसू रामा फुलमाळी (वय ४२, धंदा हॉटेल, रा. म्हेत्रे वस्ती, जामखेड) यास शंकर तात्या लोखंडे, ताया तात्या लोखंडे व अनिल वाघमोडे (पुर्ण नाव माहीत नाही) तिघे रा. आरोळे वस्ती, जामखेड या आरोपींनी म्हेत्रे वस्ती ते खडकवाडीकडे जाणाऱ्या रोडवर जाधव यांच्या शेताजवळ आरोपींनी आणलेल्या चारचाकी गाडीमध्ये बळजबरीने घातले. त्यास कर्जत येथील एका दुकानात डांबून ठेवून प्लास्टिकच्या पाइपने मारहाण केली, तसेच आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर फिर्यादीकडून त्याच्या मर्जीविरोधात शंभर रुपयांच्या बॉण्डवर नोटरी करून कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. तसेच जिवे मारण्याची धमकीदेखील दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत म्हसू रामा फुलमाळी याने १० जानेवारीला जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kidnapped from a four-wheeler and parked Crime Filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here